वैभववाडीत शिवसेनेची ताकद आणखी वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

वाभवे वैभववाडीच्या माजी उपनगराध्यक्षा संपदा राणे, सदानंद माईणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळा इंदप, शिवाजी राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आगामी नगर पंचायत निवडणुकीत होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, रवींद्र रावराणे, बँक संचालक दिगंबर पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, दिव्या पाचकुडे, अशोक रावराणे, शहरप्रमुख प्रदीप रावराणे आदी उपस्थित होते.