
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी अधिकृतरित्या याबाबत माहिती दिली आहे. तसेच पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या त्रासामुळे 10 नोव्हेंबर रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आपल्या प्रकृतीविषयीची माहिती राज्यातील जनतेला दिली होती. जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्याने लवकर तब्येत बरी होईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर यशस्वी स्पाइन सर्जरी करण्यात आली. एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांच्या निरीक्षणाखाली ते उपचार घेत होते.




























































