वाळूचा अवघा कॅनव्हास झाला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशामध्ये पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सव सुरू झाला आहे. कोणार्क शहरातील चंद्रभागा किनारी वाळूचे एकापेक्षा एक सरस शिल्प साकार झाले आहे. वाळूचा जणू अवघा कॅनव्हास झाला आहे.

आयोजक सुदर्शन पटनायक यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे जगभरातील वाळू शिल्पकार यंदा महोत्सवात सहभागी होऊ शकले नाहीत. ओडिशा, राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र प्रदेश, झारखंड आदी 12 राज्यांतील वाळू शिल्पकार आपली कला सादर करत आहेत.

आंतरराष्ट्रीय वाळू शिल्प महोत्सवाला 2015 पासून सुरुवात झाली. कोणार्क डान्स फेस्टिव्हलचा हा एक भाग आहे.