
इन्स्टाग्रामवर सध्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील लेझी लॅड गाण्याने धुमाकूळ घातला आहे. लेडी लॅड गाण्याचे चॅलेंज स्वीकारून इन्स्टाग्रामवर सेलिब्रेटी, नेटकरी त्यावर विचित्र स्टेप्स करताना दिसत आहेत.
अशातच स्पाइसजेट कंपनीत काम करणारी हवाई सुंदरी उमा मीनाक्षीने हिनेसुद्धा या डान्स चॅलेंजमध्ये उडी घेतली आहे. तिने चक्क विमानतळावरच या गाण्यावर ठेका धरला. तिच्या चेहऱ्यावरील हावभावाची चर्चा होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 57 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे तर अनेक युजर्सनी तिच्या डान्स स्टेप्सचे भरभरून कौतुक केले आहे.

























































