हार्दिक पांड्या क्रिकेटच्या ‘या’ फॉरमॅटमधून घेणार निवृत्ती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दीक पांड्याबाबत एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. हार्दीक पांड्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे समजते. तशी चर्चा क्रिडा वर्तुळात रंगू लागल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. हार्दीक पांड्याने त्याच्या या निर्णयाबाबत बीसीसीआयला कळवले असून लवकरच तो त्याबाबत अधिकृत घोषणा करेल असे समजते.

हार्दिक पांड्याने शेवटचा कसोटी सामना 2018मध्ये खेळला होता. ‘हार्दीक गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याने अद्याप निवृत्तीबाबत अधिकृतरित्या बीसीसीआयला सांगितलेले नाही. मात्र या निवृत्तीमुळे तो एकदिवसीय सामन्यांवर त्याचे लक्ष केंद्रीत करू शकतो. तसंही कसोटी संघात त्याला संधी मिळेल अशी शक्यता कमी आहे’, असे इनसाईड स्पोर्ट्सने एका बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे.