ठाणे जिल्हा लसीकरणात कोट्यधीश, 1 कोटी डोसेसचा टप्पा ओलांडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने आज 1 कोटी डोसेसचा टप्पा ओलांडला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार 44 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण डोसेसची संख्या 1 कोटी 36 हजार 649 एवढी झाली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करीत लसीकरणाला अधिक गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस 60 लाख 61 हजार 648 नागरिकांना तर 39 लाख 75 हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याने गेल्या काही दिवसांपासून लसीकरणात आघाडी घेतली दिवसाला सरासरी 50 हजारापर्यंत लसीकरण केले जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात दर दिवशी 459 ते 500 लसीकरण केंद्र आयोजित करण्यात येत आहेत. मात्र अजुनही लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला सांगितले.