मोबाईल लिंक 1 लाखाची, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची सायबर ठगाने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. 1 लाख 13 हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सायबर ठग हे नागरिकांना विविध योजना, लिंक पाठवून त्याच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत. मोबाईलवर लिंक पाठवत सायबर ठग हे माहिती जाणून घेत बँक खात्यावर डल्ला मारतात. सायबर ठगाने अशाच प्रकारे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची फसवणूक केली आहे. चार दिवसांपूर्वी विनोद कांबळीला मोबाईलवर एक लिंक आली. ती लिंक त्यांनी ओपन केली. लिंक ओपन होताच कांबळी याच्या खात्यातून 1 लाख 13 हजार रुपये काढले गेले. पैसे गेल्याचे लक्षात येताच कांबळीने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. कांबळीच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते पैसे कोणत्या खात्यात गेले याचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत. या गुह्याच्या तपासासाठी सायबर पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.