लग्नानंतर नवरदेव-नवरीची डबल सीट बिदाई, नेटकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
wedding-ride

सध्या लग्नसराईचा हंगाम आहे, अशा वेळी वधू-वरांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होणे नेहमीचेच झाले आहे. लग्नाचे नवनवीन मजेदार व्हिडीओ रोज पाहायला मिळतात.

सध्या वधू-वराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहताना तुम्हालाही मजा येईल. या व्हिडीओमध्ये दिसतं आहे की, वराकडे कार किंवा अन्य कोणतेही मोटर वाहन दिसत नाही. तर तो बिदाईच्या वेळी आपल्या स्टाइलनं वधूला सायकलवर बसवून त्याच्या घरी आणतो आहे. या व्हिडीओने सर्वांचीच मनं जिंकली असून लोकांना तो खूप आवडला आहे.

मध्य प्रदेशातील निवारी जिल्ह्यातील पृथ्वीपूरचे डीएसपी संतोष पटेल यांचे हे लग्न आहे. साधेपणाने लग्न करणाऱ्या डीएसपी साहेबांनी वधूला गाडी, बस किंवा ट्रेनने घरी नेले नाही, तर वधूला सायकलवर नेले. सायकलवर नव-या नववधूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या वधू-वराचा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर होत आहे. व्हिडीओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आनंद ही मनाची अवस्था आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर दिसत आहेत. त्यांच्याशिवाय गावातील घरातील लोकही तिथे जमलेले आहेत. जोरजोरात बँड बाजाही वाजतोय, हे पाहून लक्षात येतं आहे नवरी लग्नानंतर निरोप घेत असतानाचा हा व्हिडीओ आहे. वरराजा सायकलवर बसतो आणि वधूला सायकलवर बसवतो आणि दोघेही हसत हसत पुढे जातात. लोक त्याचा व्हिडिओ बनवत आहेत आणि मुले त्याच्या मागे धावत आहेत.

वधू-वरांचा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. या व्हिडीओने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. लोक वराचे कौतुक करत आहेत आणि व्हिडीओवर अनेक कमेंट्सही करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना लोक वधू-वरांना आशीर्वाद आणि लग्नाच्या शुभेच्छाही देत​आहेत.