
ऐन ख्रिसमसच्या तोंडावर एक अनोखे स्वेटर बाजारात विक्रीसाठी आले आहे ज्याची किंमत ऐकूनच अनेकांना हुडहुडी भरली आहे. या खास स्वेटरची किंमत तब्बल 30 लाख रुपये इतकी आहे. साहजिकच या स्वेटरमध्ये असं काय आहे की ज्यामुळे याची किंमत इतकी महाग आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. या स्वेटरवर जगातील अनेक महागडी रत्नं लावण्यात आली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या इटालियन सिल्कपासून तो विणण्यात आला आहे. एडेन लिबन या कलाकाराने हे खास स्वेटर तयार केले असून त्यासाठी त्याला तब्बल 3 हजार तास लागले आहेत. आपली सगळी जमा पुंजी त्याने स्वेटर तयार करण्यासाठी खर्च केली असून सध्या तो खरेदीदाराच्या शोधात आहे.





















































