
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी नुकतीच राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. आपल्या प्री-वेडिंग शूटचे फोटो कतरिनाने मंगळवारी सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमधील दोघांच्या केमिस्ट्रीसोबत चर्चा रंगलीय ती कतरिनाने परिधान केलेल्या पेस्टल रंगाच्या साडीची. फॅशन ब्रॅण्ड ‘सब्यासाची’ने या साडीचे डिटेल्स इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ट्रेलिंग वेलसह ही विंजेट काऊचर साडी डिझाईन करण्यासाठी सुमारे 40 कारागीरांची 1800 हून अधिक तासांची मेहनत लागली आहे. ही साडी एखाद्या व्हाईट वेडिंग गाऊनपेक्षा कमी नव्हती. हॅण्डकट इंग्लिश फ्लॉवर्सनी साडीची आकर्षक सजावट करण्यात आली असून त्यावर बंगालमधील महिला कारागीरांनी भरतकाम केले आहे. याशिवाय मौल्यवान रत्नांनी साडीला सजविण्यात आले होते.
























































