
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह खंडणी केस मध्ये फरार असलेल्या विनय सिंहला आज क्राईम ब्रँच युनिट 11 ने अटक केली. खंडणीच्या गुह्यात विनयला पोलिसांनी फरार घोषित केले होते. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बांधकाम व्यावसायिक विमल अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाज भाटी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या गुह्याचा तपास युनिट 11 करत आहेत. या गुह्यात युनिट 11 ने हवाला ऑपरेटर अल्पेश पटेल, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक केली होती. या दोघांच्या अटकेनंतर पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, विनय सिंह, रियाज भाटीला चौकशीसाठी समन्स केले होते. तीन वेळा समन्स करून देखील ते चौकशीला न हजर झाल्याने त्या तिघांविरोधात किल्ला कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर परमबीर सिंह हे चौकशीसाठी क्राईम ब्रँचच्या कार्यालयात आले होते. क्राईम ब्रँचच्या अधिकाऩयाने परमबीर सिंह यांची सुमारे सात तास चौकशी केली होती. फरार असलेला विनय सिंहला क्राईम ब्रँच युनिट 11 शोधत होते. तो आज कांदिवली परिसरात आला असता त्याला क्राईम ब्रँचने अटक केली.




























































