1500 किलो वजनाचा रेडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या सांगलीत एका रेडय़ाची चांगलीच चर्चा रंगलेय. तासगावातील कृषी प्रदर्शनात हा रेडा आवर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. या रेड्याचे नाव गजेंद्र आहे. त्याचे वजन दीड टन तर किंमत तब्बत 80 लाख रुपये आहे.

गजेंद्र रेडा मुरा जातीचा आहे. त्याला बघण्यासाठी नागरिकांची पावले कृषी प्रदर्शनाकडे वळत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेलगतच्या मंगसुळी येथून हा 1500 किलोचा रेडा आला आहे. याआधी गजेंद्रला 80 लाखांची मागणीही आली होती. पण मालक विलास नाईक यांनी त्याला विकले नाही. गजेंद्र एवढा वजनदार आहे, तर त्याचा खुराकही तसाच तगडा आहे. दिवसाला त्याला 15 लीटर दूध, ऊस, गवत असे खाद्य द्यावे लागते.

आतापर्यंत गजेंद्रला कर्नाटकासह चार प्रदर्शनात नेण्यात आले होते. सध्या तो सांगलीच्या कृषी प्रदर्शनात आलाय. प्रत्येक ठिकाणी त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी होते. गजेंद्र म्हणजे शेतीची शान असल्याचे त्याचे मालक सांगतात.