टीईटी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती, 15 दिवसांत अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) झालेल्या गंभीर अनियमितताप्रकरणी सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. समितीमध्ये शिक्षण आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय संचालक हे सदस्य असतील. तर राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष या समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती यंदाच्या टीईटी परीक्षेतील तसेच जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल 15 दिवसांत शालेय शिक्षणमंत्र्यांना सादर करतील.