
चित्रपट निर्माता पराग संघवी याला मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने एका घोटाळ्याप्रकरणी आज अटक केली. संघवीला कोर्टात हजर केले असता त्याला 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
महेंद्र शाह यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे फ्लॅटच्या गैरव्यवहाराबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून पराग संघवी याला आज अटक केली. शाह यांनी 2013मध्ये कमला लॅण्डमार्क ग्रुपची सिस्टर कंपनी असलेली कमला इन्फ्रा आणि कमला लॅण्डमार्क प्रॉपर्टीज यांच्याकडून वांद्र्याच्या टर्नर रोड येथे तीन फ्लॅट खरेदी केले होते. त्यातील एक फ्लॅट शाह यांनी कमला ग्रुपची सिस्टर कंपनी आणि आरोपी पराग संघवी संचालक असलेल्या मे अलुम्ब्रा इंटरटेन्मेंन्ट ऍण्ड मीडिया प्रा. लिमिटेड या कंपनीस तर इतर दोन फ्लॅट मे. मेटालिक प्रा. लि. कंपनीस भाडेतत्त्वावर दिले होते. असे असताना सदरचे फ्लॅट मे. कमला लॅण्डमार्क प्रॉपर्टीज या कंपनीने तिसऱ्याच व्यक्तीला विकल्याची महेंद्र शाह यांची तक्रार होती.


























































