ठाणे खाडीत मच्छीमारांना मासेमारीची परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

ठाणे खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छीमारांना परंपरागत मासेमारी करण्याची परवानगी आहे अशी माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. नवी मुंबईतील तलाव कांदळवन म्हणून घोषित केल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आल्याबाबत आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. भरणे म्हणाले, ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील 1471 हेक्टर कांदळवन क्षेत्र शासनाने राखीव वन म्हणून अधिसूचित केले आहे. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या व्यवस्थापन आराखडय़ामध्ये खाडी क्षेत्रात स्थानिक मच्छीमारांना परंपरागत मासेमारी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.