
व्हॉट्सऍप हे इन्स्टंट मेसेजिंग ऍप आता ऑनिमेटेड हार्ट इमोजी घेऊन येणार आहे. सध्या व्हॉट्सऍपवर फक्त हृदयाचा ठोका देणारा इमोजी उपलब्ध आहे. नवीन इमोजी एकाच हार्ट-बीटिंग ऑनिमेशनमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये दिसतील.
अँड्राईड आणि आयएसओ युजर्सला ऑनिमेटेड हार्ट इमोजी देण्यावर व्हॉट्सऍप कंपनी काम करत आहे. एका रिपोर्टनुसार इमोजी हिरव्या, पिवळ्या, नारंगी, जांभळ्या, काळा, पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतील. हे फिचर डेव्हलप होत असल्याने ते अद्याप बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध नाही. याशिवाय व्हॉट्सऍप युजर्सना डिसअपीयरिंग मेसेजेससाठी वेळ मर्यादा सेट करण्यास अनुमती देईल.
कंपनी सध्या तीन वेळेचे पर्याय देते. 24 तास, 90 दिवस आणि 7 दिवस. टाइम लिमिट इनेबल झाल्यावर सेंडरने पाठवलेला प्रत्येक मेसेज निर्धारित वेळेनंतर डिलीट होण्यासाठी सेट केला जाईल.

























































