
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ‘आसाम रायफल्स’च्या भरतीसाठी गेलेले तरुण संकटात सापडले आहेत. महाराष्ट्रातून या भरतीसाठी आसाममध्ये गेलेले 200 पेक्षा जास्त तरुण अडचणीत असल्याचे कळताच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांच्याशी फोनवरून संपर्क साधत आवश्यक ती सर्व मदत त्यांच्यापर्यंत पोहचवली.
‘आसाम रायफल्स’च्या भरतीसाठी महाराष्ट्रातून आसाममध्ये गेलेल्या तरुणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या मुलांना दिपू कैद्यकीय महाकिद्यालय आणि रुग्णालयात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांना अन्नपाणीही मिळाले नव्हते. आम्हाला चांगले जेवण, गरम पाणी आणि परीक्षेला बसू देण्याची व्यवस्था करा, अशी माफक अपेक्षा तीन दिवसांपासून उपाशीपोटी असलेल्या उमेदवारांकडून करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आसाम सरकारकडून तत्काळ कोरोना सेंटरमध्ये असलेल्या तरुणांना मदत करण्यात आली.
‘आसाम रायफल’ या निमलष्करी दलातील हवालदार पदासाठी 7 क 8 जानेवारीदरम्यान भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या किकिध राज्यांमधून तरुण आसाममध्ये गेले होते.
महाराष्ट्रातून 200 ते 250 हून अधिक उमेदवार 3 जानेकारीलाच अँगलाँग या जिल्ह्यातील दिपू या शहरामध्ये दाखल झाले होते. दरम्यान, भरतीपूर्वी करण्यात आलेल्या कोरोनाच्या रॅपीड अँटिजेन तपासणीत महाराष्ट्रातील 60 ते 70 जण कोरोना संसर्गाने बाधित झाल्याचे आढळून आले.
त्यांच्यासह 200 हून अधिक तरुणांना दिपू वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामधील कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे तीन दिवस त्यांना उपाशी राहावे लागले. नंतर निकृष्ट जेवणामुळे तब्येत बिघडली.

































































