डी मार्टला 553 कोटींचा नफा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डी मार्ट कंपनीने ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात तब्बल 553 कोटींचा नफा कमवला आहे. गेल्या वर्षाच्या तिमाही नफ्याच्या तुलनेत 24 टक्क्यांनी ही वाढ जास्त आहे. राधाकिशन दमानी यांच्या मालकीची डी मार्ट ही कंपनी असून कोरोनामुळे इतरांप्रमाणे या कंपनीलाही आर्थिक फटका बसला होता, मात्र गेल्या वर्षीपासून अर्थव्यवस्था कोरोना संकटापासून सावरत असून टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्यात आले, मॉल खुले करण्यात आले. त्याचा फायदा डी मार्टला झाला. दरम्यान, कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 9 हजार 218 कोटींचा महसूल कमवला.