अबब! 400 किलोचे टाळे, 30 किलोची चावी; अयोध्येतील राम मंदिरासाठी अनोखी भेट  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत तयार होणाऱया प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी अलीगढमधील एका व्यक्तीने तब्बल 400 किलो वजनाचे भलेमोठे टाळे तयार केले आहे. आता भलेमोठे टाळे म्हटले तर त्याची चावीदेखील तशीच असणार ना… हे टाळे उघडण्यासाठी तयार केलेल्या चावीचे वजन 30 किलो इतके आहे.

अलीगढमधील ज्वालापुरी येथे राहणाऱया 65 वर्षीय सत्यप्रकाश शर्मा यांनी काही कारागीरांच्या मदतीने हे टाळे तयार केले आहे. 10 फूट उंच, 6 फूट लांब आणि 6 इंच जाडीचे हे टाळे तयार करण्यासाठी त्यांना एक लाख रुपये इतका खर्च आला आहे.

सत्यप्रकाश शर्मा यांचा टाळे बनण्याचा व्यवसाय आहे. यापूर्वी त्यांनी 300 किलो वजनाचे टाळे तयार केले होते. आता त्यांनी 400 किलोचे टाळे बनवत स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱया परेडमध्ये या भव्यदिव्य टाळ्याचे प्रदर्शन केले जावे, अशी सत्यप्रकाश यांची इच्छा आहे. यानिमित्ताने आपली कला जगभरात पोहोचेल, असे त्यांचे म्हणणे आहे.