
बँकेत, म्युचुअल फंड किंवा इतर कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यास किती टक्के परतावा मिळेल, असा प्रश्न केल्यास कोणत्याही योजनेत जास्तीतजास्त 20 ते 22 टक्के परतावा मिळून शकतो. मात्र, जर 50, 100 किंवा 1000 टक्के परतावा मिळू शकतो, असे केणी सांगितले, तर त्यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, फक्त 15 महिन्यात एका रुपयाचे तब्बल अडीच लाख रुपये झाले आहेत. ही कमाल एका क्रिप्टोकरन्सीने केली आहे.
फक्त गंमत म्हणून या क्रिप्टोकरन्सीची सुरुवात करण्यात आली होती. मात्र, या क्रिप्टोकरन्सीने गुंतवणूकदारांना मालमाल केले आहे. कोणाचाही विश्वास बसणार नाही एवढा जबरदस्त परतावा या क्रिप्टोकरन्सीने दिला आहे. एका रुपयाचे 15 महिन्यात तब्बल अडीच लाख रुपये झाले आहेत. आता कोणत्या क्रिपिटोकरन्सीने एवढे जबरदस्त रिटर्न दिले आहे, असा प्रश्न पडणारच.
जपानी ब्रिडच्या एका कुत्र्याच्या नावावरून Shiba Inu ही क्रिप्टोकरन्सी फक्त गंमत म्हणून सुरू करण्यात आली होती. मात्र, ही क्रिप्टोकरन्सी लॉन्च होताच तिने कमाल केली आहे. ह क्रिप्टोकरन्सी लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत या क्रिप्टोकरन्सीने तब्बल 2,50,00,000 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. सर्वात जास्त रिटर्न देणारी आणि गुंतवणूकदारांना मालमाल करणारी ही क्रिप्टोकरन्सी ठरली आहे.
या क्रिपटोकरन्सीची सुरुवात ऑगस्ट 2020 मध्ये झाली होती. लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे फक्त 15 महिन्यात ही 19 बिलियन डॉलर एमकॅप असलेली ही जगातील तेराव्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी ठरली आहे. कमी काळात खूप मोठी कमाल दाखवणाऱ्या या क्रिप्टोकरन्सीने सर्वात जुनी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनलाही मागे टाकले आहे. 15 महिन्यांपूर्वी या क्रिप्टोकरन्सीमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली असती तर ती आज अडीच लाख रुपये झाली असती.
कॉइनबेस डेटाच्या आकडेवारीनुसार 1 ऑगस्टला या मीमकॉइनचे मूल्य फक्त 0.00000011 रुपये होते. तर आता याचे मूल्य 0.00220384 रुपये आहे. एकावेळी याचे मूल्य 0.0036 रुपयांपर्यंत पोहचले होते. ही क्रिप्टोकरन्सी Etherum Token म्हणून लॉन्च करण्यात आली. टेसलाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी या क्रिपिटोकरन्सीबाबत केलेल्या ट्विटमुळे याला प्रसिद्धी मिळाली आणि त्यात झपाट्याने तेजी आली. अजूनही हे कॉइन तेजीत आहे.




























































