सेल्समनने मारला डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सवासात लाख रुपयांचे दागिने चोरी प्रकरणी सेल्समनला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. प्रणव पंसारा असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. गेल्या महिन्यात दुकानातून सोने चोरीला गेल्याचे तक्रारदार यांना समजले. त्यानंतर त्यांनी दुकानातील दागिन्यांची तपासणी केली. तेव्हा दुकानातून सवासात लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशीदेखील केली. चौकशी सुरू असतानाच प्रवण हा गैरहजर होता. तक्रारदार यांनी प्रणवविरोधात बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात बांगूरनगर पोलिसांनी प्रवणला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.