नीतीश भारद्वाज 12 वर्षानंतर बायकोपासून झाले विभक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाभारत मालिकेतील श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता नीतीश भारद्वाज 12 वर्षानंतर पत्नी स्मितापासून विभक्त झाला आहे. त्यांची पत्नी स्मिता सनदी अधिकारी आहेत. ते दोघे सप्टेंबर 2019 मध्ये विभक्त झाले होते. त्यानंतर स्मिता जोन जुळ्या मुलींसह इंदूरमध्ये राहत आहेत. आपण पत्नीसोबत विभक्त झाल्याची माहिती भारद्वाज यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली आहे.

आपण फॅमेली कोर्टात सप्टेंबर 2019 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे भारद्वाज यांनी सांगितले. आमचे नाते का टिकले नाही किंवा आम्ही वेगळे का झालो, याबाबत अधिक बोलायचे नाही. सध्या याबाबत न्यायालयात प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मृत्यूपेक्षाही घटस्फोट अधिक त्रासदायक आणि वेदनादायक असतो, असे त्यांनी सांगितले. जेव्हा तुम्ही एकटे राहता, तुमचे एकटेपणा अनुभता, त्यावेळी ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, असे ते म्हणाले.

आपला विवाह संस्थेवर विश्वास आहे. मात्र, आपल्या नशीबात कदाचित ते सुख नाही. नाते न टिकण्यासाठी अनेक कारणे असू शकतात. काहीवेळी जोडीदाराच्या स्वभावाशी जुळवून घेणे कठीण होते. काहीवेळा जोडीदाराचा हेकेखोरपणा सहन होत नाही. तर कधीकधी नात्यांमध्ये अंहकार आडवा येतो. तर कधी योग्य निर्णय होत नसल्याने किंवा योग्य मार्ग न मिळाल्याने नात्यात कटुता येते. मात्र, जेव्हा पतीपत्नीचे नाते बिघडते, त्याचा मुलांवरही परिणाम होतो. मुलांवर याचे वाईट परिणाम होतात. त्याला पालकच जबाबदार असतात, असे ते म्हणाले.

विभक्त झाल्यानंतर मुलींना भेटला किंवा त्यांचाशी बोलणे होते काय, या वर ते म्हणाले. सध्या याबाबत आपल्याला बोलायचे नाही. त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची परवानगी आपल्याला मिळेल किंवा नाही, याबाबत अद्याप काहीच माहीत नाही. त्यामुळे आता यावर बोलणे योग्य होणार नाही, असे ते म्हणाले.