
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयाकडूनही दिलासा मिळलेला नाही. न्यायालयाने देशमुख यांचा मनी लाँडरिंग प्रकरणातील डिफॉल्ट बेलचा अर्ज आज फेटाळला आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला. जामीन अर्जात देशमुख यांनी आपल्याला न्यायालयीन कोठडीत पाठकल्याचा आणि क्रिमिनल प्रोसिजरनुसार त्याची 60 दिवसांची मर्यादा ओलांडली असल्याचा युक्तिवाद केला होता. ईडीकडून दिशाभूल केली जात असल्याची बाजू अनिल देशमुख यांच्या कतीने मांडण्यात आली. मात्र ईडीकडून याचा विरोध करण्यात आला. निश्चित केळेआधी आरोपपत्र दाखल झाल्यास आरोपीला डिफॉल्ट बेल मागता येत नाही, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला. ईडीकडून 29 डिसेंबर रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले.
























































