भुकेने व्याकूळ झालेल्या बाळासाठी दूध हवंय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाडीची वेळ चुकू नये यासाठी घाईगडबडीत बॅग भरताना आपण अनेक गोष्टी विसरतो. खासकरून प्रवासात सोबत लहान मुले असतील तर अशावेळी मोठी पंचाईत होते. असाच काहीसा प्रकार मूळच्या सुलतानपूर येथील अंजली तिवारी यांच्याबाबतीत घडला. ही महिला आपल्या आठ महिन्यांच्या बाळासह घरी येण्यासाठी एलटीटी एक्स्प्रेसच्या B-1 कोचच्या 17 आणि 20 क्रमांकावर चढल्या. ट्रेन अडीच वाजता भीमसेन स्टेशनवर पोहोचणार होती. तेव्हा त्यांचे बाळ भुकेमुळे रडायला लागले. महिलेने त्याला शांत करण्याचे सर्वकाही प्रयत्न तिने केले, पण बाळ काही शांत होईना. अखेर या महिलेने कुटुंबीयांना फोन करून हा प्रकार सांगितला. कुटुंबातील एका सदस्याने ट्विट करून रेल्वे प्रशासनाकडे मदत मागण्याची कल्पना सुचवली. त्यानुसार महिलेने ट्विट करत रेल्वेमंत्र्यांकडे मदत मागितली. या ट्विटनंतर अवघ्या 23 मिनिटांत कानपूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने त्या बाळासाठी दूध उपलब्ध करून दिले. त्यामुळे अंजली यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावरही रेल्वे प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.