मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या दालनात साप!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या दालनात आज सकाळी घोणस जातीचा साप आढळून आला. सुमारे 5 फूट लांब असलेल्या या सापाला सर्पमित्रांद्वारे पकडण्यात आले.

कोविडमुळे मुंबई उच्च न्यायालयात सध्या ऑनलाइन सुनावणी घेण्यात येत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयातील काही न्यायमूर्ती हे त्यांच्या दालनातूनच कामकाज पाहतात. कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी साडेनऊच्या सुमारास न्यायालयाच्या तळमजल्यावर असलेल्या न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या दालनात घोणस जातीचा बिनविषारी साप आढळून आला. सुदैवाने त्या वेळी न्यायमूर्ती दालनात उपस्थित नव्हते. अखेर तेथील कर्मचाऱयांनी पोलिसांच्या मदतीने सर्पमित्रांना बोलावले. सर्पमित्रांनी तत्काळ हायकोर्टात धाव घेत या सापाला सुखरूप ताब्यात घेतले.