
रोज सकाळी आपण टूथब्रशने दात घासतो. त्या ब्रशने सुरुवातील जितके चांगले दात घासले जातात, तितके छान ते नंतर घासले जात नाहीत. मग, दातांच्या समस्या उद्भवतात. यासाठी दर तीन महिन्यांनी ब्रश बदलण्याचा सल्ला दिला जातो.
पण, तीनच महिन्यांनी ब्रश का बदलावा, असा प्रश्न अनेकांना पडतो. कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देण्यात आलं आहे. जीर्ण झालेला टूथब्रश नविन ब्रशच्या तुलनेत कमी प्लाक काढतो. आणि जर प्लाक काढला नाही तर हिरड्यांचे आजार वाढतात. खराब झालेला टूथब्रश वापरल्याने दाताच्या समस्या वाढु शकतात व तोंडाची दुर्गंधी येऊ शकते वेडेवाकडे असणाऱ्या ब्रिस्टल्समुळे हिरड्यांना जखम होऊन रक्त येऊ शकतं.
काही जण जास्त दबाव देऊन दात घासतात त्यांनी लवकर ब्रश बदलायला हवा. जेव्हा तुम्हाला तुमच्या टूथब्रशचे ब्रिस्टल वेगळ्या दिशेत वळलेले दिसतात तेव्हा ब्रश बदलावा. जर आपण रोज दोन वेळा दोन – तीन मिनिटे दात घासत असाल तर , ब्रशचे मऊ ब्रिस्टल्स जीर्ण व्हायला सुरु होतील आणि त्यात बॅक्टरीया साध्या भाषेत किडे त्यांच साम्राज्य तयार करतील. त्या जीर्ण झालेल्या ब्रशने नक्कीच दात व्यवस्थित साफ होणार नाहीत.
प्रत्येक वस्तु टिकण्याचा एक मर्यादित कालावधी असतो त्या नंतर त्या वस्तुचा उपयोग परिणामकारक होत नाही. यामध्ये मग साधा टूथब्रश व इलेक्ट्रॉनिक टूथब्रशचे हेडस देखील येतात. समजा तुमच्याकडे 2 टूथब्रश आहेत आणि तुम्ही जेव्हा कामानिमित्त बाहेर जाता तेव्हा दुसरा ब्रश वापरता. तर अशावेळी काय करायचं? अशावेळी देखिल ते दोन्ही ब्रश 3-4 महिन्यांनी बदलायला हवे.
टूथब्रश बाबतीत कोणती काळजी कशी घेणार ?
नेहमी दात घासण्यापूर्वी ब्रश स्वच्छ पाण्याने धुवायला हवा. या गोष्टीकडे बरेचजण दुर्लक्ष करतात
ब्रशचे काम झाल्यावर त्याला व्यवस्थित स्वच्छ धुऊन अशा ठिकाणी ठेवावं जिथे हवेत किटाणू नसतील.
मोकळी हवा भेटेल व टूथ ब्रश कोरडा होईल अशा जागी ठेवावा यामुळे ब्रश वर बॅक्टरिया तयार होणार नाहीत.
भांडी घासताना जसा जोर लावतो तसा जोर दात घासताना लावायची अजिबात गरज नसते. आपल्याला फक्त दातांवर तयार झालेला चिकट थर काढायचा आहे, यासाठी मर्यादित दाब पुरेसा असतो.
सर्वांच्या टूथब्रशचे ब्रिस्टल्स एकमेकांना चिटकून ठेवलेले नसावेत. यामुळे बॅक्टरियांना खुलं मैदान मिळाल्यासारखं होतं व ते एका ब्रश वरून दुसऱ्यावर जातील.
व्हायरल इन्फेकशन किंवा कुठला आजार नीट झाल्यावर शक्यतो टूथब्रश बदलावा आणि आजारपणात शक्यतो स्वतःचा ब्रश वेगळीकडे ठेवावा.
दात घासल्यावर लगेच ओला टूथब्रश बंद डब्ब्यात ठेऊ नये.
टॉयलेटच्या जवळ टूथब्रश ठेवत असाल तर त्या टॉयलेट सीटपेक्षा जास्त किटाणू तुमच्या ब्रशवर मिळतील.




























































