भाजप पंजाबमध्ये 65 जागा लढवणार, पंजाब लोक काँग्रेस 37 तर एसएडीला 15 जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप 65 जागांवर लढवणार आहे, तर पंजाब लोक काँग्रेस म्हणजेच कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पार्टी 37 आणि शिरोमणी अकाली दल (संयुक्त) 15 जागा लढवणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांनी 71 जागांवरील उमेदवारांची घोषणा यापूर्वीच केली आहे. भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या उपस्थित झालेल्या पत्रकार परिषदेत आज जागा वाटपाची अंतिम घोषणा करण्यात आली. अमरिंदर सिंग आणि अकाली दलाचे सुखदेवसिंह Eिढढसा या वेळी उपस्थित होते.

पंजाब हे सीमाकर्ती राज्य असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे आणि तेथील सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्त्काचा आहे. या राज्याला आर्थिकदृष्टय़ा यशस्की करण्यासाठी तेथे स्थिर सरकारची गरज आहे. त्यामुळे पंजाब विधानसभेची ही निवडणूक खूप महत्त्वाची असल्याचे जे.पी. नड्डा म्हणाले.

कॅप्टन अमरिंदर सिंग पटियालामधून लढणार

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अमरिंदर सिंग स्वतः पटियाला शहरमधून निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या यादीत त्यांनी नऊ जाट शीख, चार दलित, तीन ओबीसी, पाच हिंदू आणि एका महिलेला तिकीट दिले आहे.