उत्तर प्रदेशमध्ये राजकीय धमाका; काँग्रेसचे स्टार प्रचारक आरपीएन सिंह भाजपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा राजकीय धमाका उडाला आहे. कॉँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले आरपीएन सिंह यांनी राजीनाम्याचा बॉम्ब फोडला आणि लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यूपीए सरकारमध्ये गृह राज्यमंत्री राहिलेले आणि राहुल गांधी यांच्या युवा ब्रिगेडचा भाग राहिलेले आरपीएन सिंह यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे.

आरपीएन सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आज आपला राजीनामा सादर केला. त्यानंतर लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना आरपीएन यांनी काँग्रेसची सद्याची कार्यपद्धती आणि पक्षाच्या नव्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी गेली 32 वर्षे एकाच पक्षात म्हणजेच काँग्रेसमध्ये कार्यरत होतो. पण काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे.