गुगल मॅपवर बनवा डिजिटल पत्ता; अचूक लोकेशनवर पोहोचण्यास होणार मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हल्ली कोणताही पत्ता शोधायचा म्हटलं तर आपण गुगल मॅपची मदत घेतो. गुगल मॅपने नुकतेच ‘प्लस कोड’ नावाच्या एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या माध्यमातून युजरला त्यांच्या घराचा डिजिटल पत्ता तयार करता येणार आहे. एखाद्याला तुमच्या घराच्या अचूक लोकेशनवर पोहोचण्यासाठी या फीचरची मदत होणार आहे.

डिजिटल पत्ता तयार करण्यासाठी नाव, घराचा क्रमांक आणि आजूबाजूचा परिसर इत्यादी सांगण्याचीदेखील गरज पडणार नाही. त्याऐवजी यात अक्षांश आणि रेखांशांचा वापर केला जाईल. हा डिजिटल पत्ता फक्त अक्षर आणि आकडय़ांच्या मिश्रणाने दर्शवला जाईल. गुगल मॅपवर हे आकडे टाकल्यावर एखाद्याला तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. या पत्त्याचा फायदा दुकानदारांना आपल्या दुकानाची ऑनलाइन जाहिरात करण्यासाठीदेखील होणार आहे.