कोयना धरण परिसरात भूकंपाचा मध्यम धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी सकाळी 9 वाजून 47 मिनिटांनी कोयना धरण परिसराला मध्यम स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्याची तीक्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 9.6 किलोमीटर, तर कोयना खोऱ्यात वाढोली गावच्या पश्चिमेला 7 किलोमीटर अंतरावर होता. केंद्रबिंदूची खोली पाच किलोमीटर नोंदली गेली आहे. हा भूकंप कोयना परिसरात जाणवल्याचे तसेच भूकंपामुळे कसलीही हानी झाली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.