शुभा खोटे पुन्हा मोठ्या पडद्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या तब्बल 69 वर्षांच्या कारकीर्दीत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी तब्बल 56 सिनेमांमध्ये काम केले असून आता यात अजून एका चित्रपटाची भर पडली आहे ती म्हणजे ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’. येत्या 25 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात शुभा खोटे यांची महत्त्वाची भूमिका आहे. तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर त्या मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे एकाच घरात अडकलेल्या कुटुंबाची आणि नवविवाहित जोडप्याची गोष्ट हा चित्रपट सांगतो. सर्वांची लाडकी आजी म्हणून शुभा खोटे या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. तब्बल 84 वर्षांच्या शुभा खोटे या चित्रपटाच्या दरम्यान स्वतःहून आघाडी घेत सेटवर सगळ्यांच्या आधी हजर राहत तर सेटवर अनेकदा त्यांनी आपल्या हाताने सगळ्यांसाठी जेवणसुद्धा बनवले होते. विनोदी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असणारा हा चित्रपट संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.