
वरळी-शिवडी इलेव्हेटर कनेक्टर उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्यामुळे परळहून प्रभादेवीच्या स्वामी समर्थ मठाच्या दिशेने येणारा जगन्नाथ भातणकर मार्ग आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून शिवडी ते वरळी असा एलिव्हेटर कनेक्टर उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. एलफिन्स्टनकडून प्रभादेवी, वरळीकडे येणारी वाहतूक दीपक टॉकीजवरून पुन्हा वरळी आणि प्रभादेवीच्या दिशेने (धन मिल नाकाकडे) वळणार आहे.
- जगन्नाथ भातणकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असला तरी आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिकेसाठी एक विशेष मार्गिका ठेवण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
- वरळी-शिवडी एलिव्हेटर कनेक्टर उड्डाणपुलाच्या मार्गात 7 मोठे खांब बसवले जाणार असून त्यावर हा संपूर्ण पूल तोलला जाणार आहे.
































































