पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचत आहे. त्याचबरोबर पुढील आठवडय़ात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपणार आहे. या निवडणुकीनंतर देशात पुन्हा इंधन दरवाढीचे सत्र सुरू होईल. इंधन दरात प्रतिलिटर 9 रुपयांपर्यंत वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली गेली आहे. कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये प्रति बॅरल 100 डॉलरची वाढ झाली आहे. त्यामुळे निर्माण झालेले 9 रुपये प्रतिलिटरचे अंतर भरून काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 2014 नंतर पहिल्यांदाच प्रति बॅरल 110 डॉलरच्या आसपास गेल्या आहेत.