
अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी असलेल्या कुरनूर धरणातून आज सकाळपासून बोरीनदीत पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी नगरपरिषद क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे, तसेच उन्हाळी हंगामातील पिकासाठीही पाणी लाभदायक ठरणार असून, शेतकरीवर्गातही समाधान व्यक्त केले जात आहे.
अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपरिषद व शेतकऱयांकरिता उन्हाळी हंगामासाठी पाणी सोडण्याकरिता दोन दिवसांपूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत कुरनूर धरणातून पाणी सोडण्याचा व त्याखालील कोल्हापूर पद्धतीचे 8 बंधारे भरून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाप्रमाणे शनिवारी सकाळी कुरनूर धरणातून बोरीनदीत साडेबाराशे क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत हे सर्व बंधारे भरून घेण्यात येणार
आहे. या पाण्यामुळे अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील शेतकऱयांना उन्हाळी पिकासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे.
उपविभागीय अधिकारी प्रकाशबाबा, एन. व्ही. उदंडे व त्यांच्या पथकाने हे पाणी सोडले असून, धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.



























































