
पंजाबच्या अमृतसर जिह्यातील सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) कॅम्पमध्ये एका जवानाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात चार सहकाऱयांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. सततच्या डय़ुटीमुळे जवानाच्या संतापाचा भडका उडाला व त्याने साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार करीत नंतर स्वतŠवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. बीएसएफच्या मुख्यालयातील भोजनालयात रविवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
एस. के. सत्यप्पा असे गोळीबार करणाऱया जवानाचे नाव असून तो महाराष्ट्रातील रहिवासी आहे. रविवारी सकाळी बीएसएफ मुख्यालयातील भोजनालयामध्ये बटालियन 144 चे जवान नाश्ता करीत होते. यादरम्यान सत्यप्पाने रागाच्या भरात साथीदारांवरच अंदाधुंद गोळ्या झडण्यास सुरुवात केली. यात चार जवान जागीच ठार झाले, तर राहुल नावाचा जवान गंभीर जखमी झाला. तेवढय़ावर न थांबता सर्व्हिस रायफल घेऊन तो भोजनालयामधून बाहेर पडला व तेथेही त्याने गोळीबार सुरुच ठेवला. नंतर पकडले जाण्याच्या भितीने सत्यप्पाने स्वतŠवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने बीएसएफ क@म्पमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बीएसएफचे आयजी आसिफ जलाल तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
अटारी-वाघा सीमेपासून 12 किलोमीटरवर घटना
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेजवळील अटारी-वाघा सीमा चौकीपासून जेमतेम 12 ते 13 किलोमीटरवर असलेल्या खासा येथील 144 व्या बटालियनच्या परिसरात ही घटना घडली. गोळीबारात मृत्यू झालेल्या जवानांमध्ये हेड कॉन्स्टेबल डी. एस. तोरसाकार, हेड कॉन्स्टेबल बलजिंदर कुमार, हेड कॉन्स्टेबल राम विनोद सिंह, कॉन्स्टेबल रतन चांद यांचा समावेश आहे.
कमाडिंग ऑफिसरच्या गाडीवरही गोळ्या झाडल्या
सत्यप्पा गेल्या काही दिवसांपासून सतत डय़ुटी लागल्यामुळे वैतागला होता. त्याने वरिष्ठ अधिकाऱयांना डय़ुटी बदलण्यासाठी वेळोवेळी विनंतीही केली होती. मात्र त्याच्या विनंतीला जुमानले गेले नाही. त्याच रागातून त्याने रविवारी गोळीबाराचा अतिरेक केला. मुख्यालय परिसरात पार्क केलेल्या कमांडिंग ऑफिसरच्या गाडीवरही त्याने गोळ्या झाडल्या.



























































