
भगवान विष्णूचा भक्त आणि वाहन असलेल्या गरुडावर ‘धर्म योद्धा गरुड’ ही मालिका लवकरच सुरू होणार आहे.
पौराणिक कथेनुसार गरुडाचे पंख हे त्याचे सामर्थ्य आणि पराक्रमाचे प्रतीक होते. गुलाम म्हणून जन्म घेतलेल्या आणि आपल्या राजवंशाबाबत अनभिज्ञ असलेल्या गरुडाने समर्पण व अद्वितीय धैर्य दाखवले. म्हणूनच गरुडाचे नाव पुराणामध्ये कोरले गेले. ही कथा आता रसिकांसमोर येणार आहे. मालिका गरुडाच्या जन्मासह सुरू होते. मालिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. अभिनेता फैझल खान प्रमुख भूमिकेत तर अंकित राज, पारूल चौहान, तोरल रासपुत्र, ऋषिकेश पांडे, विशाल करवाल, अमित भानुशाली आदी कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘धर्म योद्धा गरुड’ मालिकेच्या माध्यमातून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही मालिका ‘सोनी सब चॅनेल’वर 14 मार्चपासून दर सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 वाजता पाहता येईल.


























































