
>> नीलिमा प्रधान
मेष – विरोधात बोलणे त्रासदायक
‘मेषेच्या व्ययेशात बुध राश्यांतर, चंद्र, गुरू त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या मध्यावर तुमचा अंदाज चुकेल. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात बोलणे त्रासदायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. गाफील राहू नका.
शुभ दिनांक – 21, 26
वृषभ – तटस्थ भूमिका घ्यावी लागेल
वृषभेच्या एकादशात बुध राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. प्रगतीची संधी मिळेल, परंतु अडचणी येतील. नामवंत व्यक्तींचा परिचय होईल. नोकरीधंद्यात काम वाढले तरी उत्साह टिकून राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घ्यावी लागेल. कार्यावर लक्ष केंद्रित करा.
शुभ दिनांक – 23
मिथुन – गुंतवणुकीत सावध रहा
मिथुनेच्या दशमेशात बुध राश्यांतर, बुध-नेपच्यून लाभयोग तुमच्या अडचणी दूर करण्यास मदत करेल. घाईत गुंतवणूक करू नका. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना योग्य शब्दांत उत्तर देता येईल. ध्येय गाठता येईल. वाहन हळू चालवा.
शुभ दिनांक – 20, 25
कर्क – वाहनाचा वेग कमी ठेवा
कर्केच्या भाग्येशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग तुमचे मनोधैर्य वाढवण्यात मदत करेल. धंद्यात चांगली बातमी कळेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावरील आरोप दूर करण्याची संधी मिळेल. जनहिताच्या कामात यश. वाहनाचा वेग कमी ठेवा.
शुभ दिनांक – 20, 23
सिंह – चौफेर सावध भूमिका
सिंहेच्या अष्टमेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. वादाची ठिणगी कुठेही पडेल, सावध भूमिका घ्या. व्यवसाय, नोकरीत ज्यांना मदत केली, तेच विरोधात उभे राहतील. तेव्हा संयम राखा. राजकारणात विरोधकांशी जुंपेल, परंतु प्रतिष्ठा पणाला लावू नका. चौफेर सावध रहा.
शुभ दिनांक – 20, 25
कन्या – अडचणी कमी होतील
कन्येच्या सप्तमेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग कठीण प्रश्नांवर मार्ग काढण्यात अनुकूल ठरेल. नोकरीधंद्यातील अडचणी कमी होतील. संसारातील कामे होतील. प्रकृतीत सुधारणा होईल. स्पर्धेत दिलासा देणारी घटना घडेल.राजकीय, सामाजिक क्षेत्रात झालेला गैरसमज दूर होईल.
शुभ दिनांक – 20, 23
तूळ – रागावर नियंत्रण ठेवा
तुळेच्या षष्ठेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. मनावर दडपण आणणारी घटना घडेल. संयम, सहनशीलता, सातत्य यावर यश खेचून आणावे लागेल. व्यवसायात वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यावर टीकात्मक वक्तव्य होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ दिनांक – 20, 25
वृश्चिक – दिलासा देणारी घटना घडेल
वृश्चिकेच्या पंचमेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला धावपळ होईल. कायदा मोडू नका. नोकरी, व्यवसायात दिलासा देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नमते धोरण ठेवा. वेगाने पुढे जाल. उत्साहात भर पाडणारी बातमी मिळेल.
शुभ दिनांक – 25, 26
धनु – प्रगतीची संधी मिळेल
धनुच्या सुखस्थानात बुध राश्यांतर, चंद्र-गुरू त्रिकोणयोग तुमच्या क्षेत्रात तुम्हाला योग्य दिशा देणारा ठरेल. जिद्द व मेहनतीने व्यवसायात वाढ होईल. नोकरीत क्षुल्लक तणाव होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तत्परता ठेवा. वरिष्ठांच्या मुद्दय़ांवर सावधपणे चर्चा करा. नवीन परिचय प्रेरणादायी ठरेल.
शुभ दिनांक – 20, 26
मकर – गुंतवणूक फायदेशीर
मकरेच्या पराक्रमात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामावर लक्ष ठेवा. व्यवसाय, नोकरीत मनाप्रमाणे काम होईल. चांगली संधी शोधता येईल. कर्जाचे काम मार्गी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनाप्रमाणे योजना करा. गुंतवणूक फायद्याची ठरेल.
शुभ दिनांक – 20, 21
कुंभ – प्रत्येक दिवस यशदायी
कुंभेच्या धनेशात बुध राश्यांतर, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस यशदायी ठरेल. कोणताही वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्याच व्यक्ती विश्वासघात करतील. नोकरी, व्यवसायात जपून काम करा. भावना व व्यवहार यांची सरमिसळ करू नका.
शुभ दिनांक – 23, 25
मीन – अधिकारात वाढ होईल
स्वराशीत बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार कुणालाही आश्वासन देताना गल्लत करू नका. नोकरीत वरिष्ठांसोबत काम करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चूक सुधारता येईल. अधिकारात वाढ होईल. कला, क्रीडा, साहित्यात मेहनत घ्या.
शुभ दिनांक – 25, 26



























































