
आईशेजारी झोपलेल्या लहान मुलावर टीसीने लघवी केल्याची घटना दुरांतो निझामुद्दीन एक्सप्रेसमध्ये घडली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी टीसीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 7 मार्च रोजी हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एक 28 महिला आपल्या मुलासोबत दुरांतो निझामुद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत होती. या दरम्यान मूळचा दिल्लीचा असणारा तिकीट परीक्षक मनिष मिणा (वय – 34) रेल्वेच्या बोगीमध्ये आला आणि तिकीट तपासणी करू लागला. महिलेकडेही त्याने तिकीट तपासणी केली आणि जुजबी चौकशीही केली. महिलेनेही हसून उत्तर दिले, मात्र टीसीने संधी साधत तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिसाद न देता रडणाऱ्या मुलाला शांत करत ती झोपी गेली. मात्र यानंतर टीसीने आईशेजारी झोपलेल्या लहान मुलावर लघवी केली.
महिलेने तात्काळ आपल्या पतीला फोन लावला आणि झाल्या घटनेची माहिती दिली. महिलेच्या पतीने याची माहिती आपल्या पतीला दिली. पत्नीने तात्काळ रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईनले संपर्क साधत संबंधित टीसीविरोधात तक्रार दाखल केली. रेल्वे कर्जतला पोहोचलात रेल्वे पोलिसांनी टीसीला अटक केली.
अटकेनंतर टीसीला कर्जतच्या रेल्वे पोलीस चौकीमध्ये नेले. यानंतर या घटनेची माहिती टीसीच्या वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर टीसी मिणाला निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती जीआरपीचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी यादव यांनी दिली आहे. या प्रकरणी महिलेने 9 मार्च रोजी पुणे रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे पोलिसात रितसर तक्रार दाखल केली.


























































