एक घर चक्रावून टाकणारं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती… असं म्हटलं जातं, पण आज तुम्हाला अशा एका घराबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्याला भिंतीच नाहीत. हे घर काचेचं बनले आहे. त्याला ‘मिरर हाऊस’ असेही म्हटले जाते. हे अदृश्य घर लंडनमध्ये आहे. ते सहज कुणाला सापडत नाही. ते दिसलं तरी न दिसल्यासारखं असतं. एकदम चक्रावून सोडतं.

अद्भुत घराची जगभरात चर्चा होतेय. ‘मिरर हाऊस’च्या मालकाने सांगितलंय की, आम्ही बाहेरचं बघू शकतो, पण बाहेरच्या व्यक्ती आम्हाला बघू शकत नाहीत. कारण लोकांना वाटतं, समोर आरसा आहे. अॅलेक्स नावाच्या डिझायनरने घर बनवले आहे. घराजवळून जाणाऱया लोकांना कळतच नाही की, तिथे एक सुंदर घर आहे.