‘डेक्कन क्वीन’ला २२ जूनपासून एलएचबी डब्यांचा साज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ते पूणे या दोन महानगरांना जोडणार्‍या डेक्कन क्वीन येत्या 22 जूनपासून अत्याधुनिक एलएचबी तंत्रज्ञानाचे डब्बे जोडण्यात येणार आहेत. रेल्वेच्या या पहिल्या सुपरफास्ट गाडीचे वैशिष्ट्य असलेली ‘डायनिंग कार’(चाकावरचे उपहारगृह)लाही एलएचबीचे स्वरूप देण्यात आल्याने ही गाडी नव्या साजात प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे.

‘डेक्कन क्वीन’ ला निळ्या व पांढर्‍या रंगाऐवजी नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. या गाडीचे डब्बे एलएचबी तंत्रज्ञानाचे कल्यानंतर तिचे वैशिष्ठ्ये असलेली ‘डायनिंग कार’ एलएचबी स्वरूपात तयार करण्याचे शिवधनुष्य चेन्नईच्या आयसीएफ कारखान्याने सहज पेलले. त्यामुळे आता 22 जून पासून डेक्कन क्वीनला 17 ऐवजी 16 डबे जोडले जाणार असून त्यात पाददर्शक छताच्या ‘विस्टाडोम’ कोचचाही समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.