दुबेमुळे नाही, दवामुळे सामना गमावला – फ्लेमिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई सुपरकिंग्जची यंदाच्या आयपीएलच्या मोसमाची सुरुवात खराब झाली. चेन्नईला स्पर्धेमध्ये सलग दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. दुसऱया सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू शिवम दुबे याने एका षटकामध्ये दिलेल्या 25 धावांमुळे चेन्नईचा पराभव झाला असे सगळे म्हणत असताना संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मात्र शिवमची पाठराखण केली आहे. शिवमच्या षटकामुळे नाही तर खेळपट्टीवरील दवामुळे चेन्नईने हा सामना गमावला, असे मत फ्लेमिंग यांनी व्यक्त केले.

फलंदाजीतील हीरो गोलंदाजीत झीरो

चेन्नईचा अष्टपैलू डावखुरा खेळाडू शिवम दुबे आधी फलंदाजीत हीरो ठरला. त्याने 30 चेंडूंत 49 धावांची तुफानी खेळी करीत संघाला 210 धावांचा पल्ला गाठून दिला. डावखुऱया शिवमने 18व्या षटकात पाचव्या चेंडूवर 94 मीटर अंतराएवढा लांब षटकार ठोकला. त्याने अंबाती रायुडूच्या साथीने 37 चेंडूंत 60 धावांची भागीदारी रचली. शिवमने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पण फलंदाजीत शानदार कामगिरी करणाऱया शिवमच्या अखेरच्या षटकात एव्हीन लुईस (55) आणि आयुष्य बदोनी (9 चेंडूंत 19) यांनी 25 धावा फटकावून लढत आपल्या बाजूने वळवली.