चंद्रपूरच्या मरेगाव जंगलात आणखी एक गोळा सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील विविध भागात शनिवारी सॅटेलाईटचे अवशेष कोसळले. त्यात लोखंडी रिंग, धातूचा गोळा असे अवशेष आतापर्यंत सापडले आहेत. आता पुन्हा एक लोखंडी गोळा मरेगावचा जंगलात आढळून आला. हा गोळा 3 ते 5 किलोचा आहे.गावकऱ्यांच्या मदतीने गोळा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील आकाशात शनिवारला जळत्या वस्तू पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा दिसून आले. जिल्ह्यातील गोंडपिंपरी, धाबा, हिवरा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी, राजुरा या परिसरात हा प्रकाश दिसून आला.

सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात रात्री 8 वाजताच्या सुमारास 8 ते 10 फुटाची लोखंडी रिंग पडल्याने एकच खळबळ उडाली. रिंग बघण्याकरीता लोकांनी एकच गर्दी केली.ही रिंग पोलीसांनी ताब्यात घेतली आहे. त्यानंतर तालुक्यातील पवणार येथे लोखंडी गोळा आढळून आला.मरेगावचा जंगलात पुन्हा एक गोळा सापडला आहे. सर्व वस्तू पोलीस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत.