प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या, नांदेड हादरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-biyani

अल्पावधित बांधकाम क्षेत्रात वेगाने झेप घेणारे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्या गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घराजवळ अगदी जवळून पाठीमागून त्यांच्यावर पिस्तलमधून चार गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

जेवणासाठी म्हणून संजय बियाणी हे घरी आले होते. आणि आपल्या वाहनातून उतरून घरात जात असतानाच हल्लेखोरांनी काही कळण्याच्या आत त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. घटनास्थळी प्रचंड रक्तस्राव झाला असून तेथील काही जणांनी त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती. त्यांचा वाहन चालक रवी हा देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याच्या खांद्यावर एक गोळी लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.