कुणीतरी अज्ञात शक्ती लोकांची माथी भडकवण्याचे काम करताहेत, अत्यंत दुर्दैवी – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-press-conferenc

हे अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे. सरकारने मागण्या मान्य करून त्यादिशेने पाय उचलण्याचे काम सुरू आहे. कुणीतरी अज्ञात शक्ती लोकांची माथी भडकवण्याचे काम करताहेत हे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकार काही जणांच्या पोटात खुपतं आहे, असे काही लोक अशी काही कृत्ये करू पाहात आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.

एसटी आदोलकांनी केलेल्या आंदोलनाची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंता वाटावी अशी आहे. एसटी संपाबाबत मार्ग काढण्यासाठी, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी सरकारने सर्व उपाययोजना केल्या आहेत. न्यायालयाचा निर्णयही याच प्रकारचा आहे. आंदोलकांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

असे असतानाही एखादी अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण बिघडवत आहेत, काही लोकांची माथी भडकावून त्यांना चिथावणी देत आजच्यासारखी कृत्ये घडावी, यासाठी सातत्याने हालचाली करण्यात येत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ज्यांच्या डोळ्यात खुपतेय, ज्यांच्या पोट दुखतेय, असे काहीजण असे कृत्य करत आहेतस असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

शरद पवार हे संसदीय लोकशाही मानणारे ज्येष्ठ नेते आहेत.आंदोलन, निदर्शन मोर्चे हा जनतेचा हक्क आहे, असे मानणाऱ्या नेत्यांपैकी ते एक आहेत. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील याच विचाराचे होते.मात्र, आज ज्या प्रकारचे आंदोलन झाले, ते दुर्दैवी आहे. ते लोकशाहीला शोभणारे नाही. राज्यात अशा घटनांना थारा नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे निर्भयपणे आंदोलकांना भेटायला गेल्या. त्यांना आंदोलन थांबवण्याची विनंती करत होत्या. त्यांनी चर्चेची तयारी दाखवली, मात्र, समोरून ज्याप्रकारच्या घटना घडत होत्या. जे वर्तन होत होते, ते लोकशाहीसाठी योग्य नाही, ते शोभणारेही नाही, ही घटना दुर्दैवी आहेत. यामागे कोण नेते आहेत, त्यांचे संस्कार काय आहेत, याची माहिती घ्यावी लागेल, असेही संजय राऊत म्हणाले.