
सुरक्षित ऑनलाइन वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील किशोरवयीन आणि तरुणांसाठी डिजिटल साक्षरता आणि जागरुकता कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मेटाने महाराष्ट्र सायबरसोबत भागीदारी केली आहे. ‘वुई थिंक डिजिटल’ हा कार्यक्रम डिजिटल सुरक्षिततेच्या सर्वोत्तम पद्धतींवर लक्ष केंद्रित करेल आणि तरुणांना डिजिटल साक्षरता, जागरुकता यावरील सत्रे, प्रशिक्षण संसाधने, ज्ञान भांडार, ज्यामध्ये बाल आणि प्रौढ सुरक्षा स्वयं-सहाय्य्य सामग्री, सुरक्षा व्हिडिओ, संसाधने आणि सहाय्यक मार्गदर्शिका यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाच्या शुभारंभासोबतच, वाढत्या सायबर-गुन्ह्यांविषयी जागरुकतेचा प्रसार करून सुरक्षित ऑनलाइन वर्तन वाढीस लावणे आणि ऑनलाइन अपाय हाताळण्यासाठी किशोरांना साधने आणि संसाधने यासह सुसज्ज करणे हे मेटाचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षण मॉड्युल सायबर सुरक्षिततेच्या सर्व पैलूंवर आणि डिजिटल साक्षरतेच्या मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये इंटरनेट ब्राउझ करणे, सायबर गुंडगिरी (सायबर बुलिइंग), लैंगिक छळ (सेक्सटॉर्शन), डार्कनेट सेवा, ट्रोलिंग, ओळख चोरी (आयडेंटिटी थेफ्ट) या पद्धतींचा समावेश आहे.
या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आपले विचार मांडताना, महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) यशस्वी यादव म्हणाले, ‘तंत्रज्ञान आणि इंटरनेटने अनेकांचे जीवन सक्षम केले असताना, सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येने, या गुन्ह्यांमुळे प्रभावित झालेल्यांच्या जीवनावर अपरिवर्तनीय परिणाम होणे सुरूच आहे. आज अधिकाधिक तरुण इंटरनेटचा वापर करत आहेत आणि त्यांना विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रवेश उपलब्ध आहे आणि म्हणून आपण त्यांना शक्तिशाली साधने, संसाधने आणि ज्ञान प्रदान करणे अत्यावश्यक आहे, जे त्यांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास सहाय्यभूत होतील. या उपक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत डिजिटल साक्षरता नेण्यासाठी आमच्यासोबत भागीदारी केल्याबद्दल आम्ही मेटाची प्रशंसा करू इच्छितो.’
मेटाच्या वुई थिंक डिजिटल या उपक्रमावर उभारलेली, ही भागीदारी महाराष्ट्रातील इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांचा समावेश असलेल्या विविध शाळा आणि महाविद्यालयांतील सुमारे 10, 000 तरुणांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवते. यापूर्वी, मेटाने दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि आसाममधील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असेच प्रशिक्षण आणि कार्यक्रम संचालित केले आहेत. मेटाचे वुई थिंक डिजिटल (We Think Digital) हे, डिजिटल नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांची रूपरेषा प्रदान करते, त्यांना त्यांचे डिजिटल वर्तन आणि परस्परसंवाद याविषयी गंभीरपणे विचार करण्यास आणि ऑनलाइन जगातून अधिकाधिक घेण्यास प्रोत्साहित करते. हिंदुस्थानातील तज्ञांसोबत भागीदारीत काम करताना, वुई थिंक डिजिटल, डिजिटल जगासाठी कौशल्याने सुसज्ज जबाबदार डिजिटल नागरिकांचा जागतिक समुदाय तयार करण्याकरिता संसाधने प्रदान करते.
या सहयोगाविषयी बोलताना, ट्रस्ट अँड सेफ्टी, फेसबुक इंडियाचे (मेटा) प्रमुख सत्य यादव म्हणाले, “जेव्हा तरुण लोकांबाबत विचार केला जातो तेव्हा आमची व्यासपीठे ही वयानुरूप उचित सुरक्षितता निर्माण करण्यासोबतच जबाबदार सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत. तरुणांना सुरक्षित वाटण्यासोबतच आमच्या व्यासपीठाचा लाभ त्यांना मिळावा हे सुनिश्चित करण्याकरिता आम्ही सतत नवनवीन तंत्रज्ञान संशोधित करत आहोत. 2019 च्या अहवालानुसार, हिंदुस्थानातील सुमारे 31 टक्के इंटरनेट वापरकर्ते हे 12-19 वयोगटातील होते.’ मेटाने नेहमीच वयास अनुरूप उपाय आणि उत्पादने सादर करण्याच्या दिशेने तांत्रिक नवकल्पना अंमलात आणल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीस, मेटाने मेसेंजर किड्सवर प्लेज प्लॅनेट्स सुरू केले, हा एक परस्परसंवादी इन-अॅप क्रियाकलाप आहे, ज्यामुळे मुलांना उचित निर्णय ऑनलाइन कसे घ्यावे, सुरक्षित कसे रहावे आणि लवचिकता कशी निर्माण करावी हे शिकण्यास आणि त्याचे सराव करण्यास मदत होते. मेसेंजर किड्स प्लेज आणि प्लेज प्लॅनेट्स उपक्रम हे मेटाच्या युवा सल्लागारांच्या भक्कम भागीदारीत सुरू करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांत, मेटाने सुरक्षित आणि अधिक समावेशक इंटरनेट तयार करण्यासाठी आधीच अनेक प्रयत्न आणि उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये नवीन बाल सुरक्षा हबचा समावेश आहे, ज्यात तरुणांना सुरक्षित राहण्यास सहाय्यभूत होण्यासाठी मागणीनुसार व्हिडिओद्वारे सुरक्षा प्रशिक्षण, साधने आणि संसाधने यांचा समावेश आहे. 18 वर्षांवरील वापरकर्त्यांसाठी एनसीआयआयविषयी असलेल्या समस्येचा सामना करण्यासाठी, मेटाने युके रिव्हेंज पॉर्न हेल्पलाइनच्या भागीदारीत StopNCII.org सुरु केले आहे. हिंदुस्थानामध्ये, या व्यासपीठाने सोशल मीडिया मॅटर्स, सेंटर फॉर सोशल रिसर्च आणि रेड डॉट फाऊंडेशन यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी केली आहे आणि जगभरातील महिलांना विना-सहमती अतिजवळीक प्रतिमासृष्टीचा (एनसीआयआय) प्रसार रोखण्यास आणि त्यास तोंड देण्यास सक्षम करेल.





























































