
भंगार गोळा केलेल्या पिशव्या चोरल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या झाल्याची घटना शिवडी येथे घडली. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
शिवडी दारूखाना येथील लकडा बंदर काटय़ाशेजारील फुटपाथवर फुफा नावाचा एक तरुण बेशुद्धावस्थेत सापडल्याने शिवडी पोलिसांनी त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. धारदार शस्त्र्ााने मारहाण केल्यामुळे तरुणाची हत्या झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्यानंतर शिवडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा लकडा बंदर परिसरात मृत व्यक्ती हा अफझल शेख याच्यासोबत भंगार गोळा करायचे काम करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अफझलला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुह्याची कबुली दिली. भंगार गोळा केलेली पिशवी चोरल्यामुळे लोखंडी हत्याराने त्याची हत्या केल्याचे अफझलने सांगितले.























































