पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला; 40 नागरिक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात 40 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून पाकिस्तानविरोधात जोरदार निदर्शने केली. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याबाबत अजून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. हवाई हल्ल्याचा अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध केला. तसेच तालिबान सरकारने पाकिस्तानचे राजदूत मनसूर अहमद खान यांना समन्स बजावले आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानवर (टीटीपी) हवाई हल्ला करण्यात आल्याचे पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे.