
कोळसाटंचाईमुळे महानिर्मितीसह सर्वच औष्णिक वीज केंद्रातील वीजनिर्मितीवर विपरीत परिणाम झाला असून भारनियमन करावे लागत आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये महानिर्मितीने आपल्या नाशिक वीज पेंद्रातील 210 मेगावॅट क्षमतेच्या वय झालेल्या वीज संचाचा कोळसा आपल्याच इतर वीज पेंद्रांकडे वळवणे गरजेचे आहे. मात्र महानिर्मितीने त्याकडे साफ दुर्लक्ष करत सदरच्या संचाच्या वाटय़ाला दररोज येणारा सुमारे 2250 मेट्रिक टन कोळसा इतर वीज पंपन्यांना देण्याबाबत टेंडर काढले आहे. त्यामुळे वीज क्षेत्रातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
महानिर्मितीच्या नाशिक औष्णिक वीज पेंद्रातील 210 मेगावॅटच्या संचाचे वय झाल्याने त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे या संचात तयार होणारी वीज महागडी ठरत आहे. परिणाम महानिर्मितीने येथील वीजनिर्मिती थांबवली आहे. त्यामुळे दररोज या संचाच्या वाटय़ाचा कोळसा शिल्लक राहत आहे. त्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने शिल्लक कोळसा इतर वीज पंपन्यांना पुरवण्याबाबत निविदा काढल्या आहेत. सदरचा कोळसा ज्या वीज पंपनीला दिला जाईल त्यांच्याकडून महानिर्मितीला प्रकल्पाचा स्थिर आकार मिळणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. मात्र कोळशाआभावी स्वतःचे वीज संच कमी क्षमतेने चालवावे लागत असताना शिल्लक राहणारा कोळसा आपल्याच इतर वीज पेंद्राकडे न वळवता भलत्याच वीज पंपन्यांना देण्यामागे काय गौडबंगाल आहे असा प्रश्न उभा राहिला आहे.
डब्ल्यूसीएलकडून मिळतो कोळसा
नाशिक औष्णिक वीज पेंद्राला वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) विदर्भात असलेल्या कोळसा खाणीतून कोळसा मिळतो. त्याचा आपल्याच इतर वीज पेंद्रामध्ये गरजेनुसार वापर करणे आवश्यक असताना इतर पंपन्यांना कोळसा देण्यात कोणाचे हितसंबंध दडले आहेत, असा सवाल वीज कर्मचारी करत आहेत.

































































