
सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी रिझर्व्ह बँकेने मोठे पाऊल उचलले आहे. बिगर बँकिंग कंपन्या विकास प्रकल्पाशी संबंधित सर्व मान्यता मिळालेल्या विकासकाला कर्ज देऊ शकतात, असा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. या निर्णयामुळे अधिकाधिक लोकांचे घराचे स्वप्त पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बिगर बँकिंग वित्तीय पंपन्यांनी त्यांच्या प्रकल्पांसाठी सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच रिअल इस्टेट क्षेत्राला कर्ज द्यावे. मात्र हे कर्ज देण्यापूर्वी विकासकाने सरकार आणि इतर नियामक प्राधिकरणांकडून योग्य त्या मंजुरी मिळवल्या आहेत ना याची खात्री करून घ्यावी, असे म्हटले आहे.
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांवरील पदाधिकाऱयांच्या कर्जावर मर्यादा
बिगर बँकिंग वित्तीय पंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच त्यांचे नातेवाईक तसेच संबंधित संस्थांसह त्यांच्या संचालकांना पाच कोटी आणि त्याहून अधिक कर्ज देऊ नये. मात्र पाच कोटी रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी कर्जदारांना योग्य प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. मध्यम आणि उच्चस्तरीय बिगर बँकिंग वित्तीय पंपन्यांसाठी हे नियम लागू करण्यात आले आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.



























































