
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय निर्माते- दिग्दर्शक टी. रामाराव यांचे बुधवारी चेन्नई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. हिंदी आणि तमीळ अशा जवळपास 70 चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. सुपरस्टार रजनीकांत यांना अंधा कानून या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आणले होते. अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत सलग नऊ हीट चित्रपट त्यांनी दिले होते. यात हकीकत, जुदाई, एक ही भूल, लोक-परलोक, मांग भरो सजना, सदा सुहागन आणि मजबूर या चित्रपटांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, ऋषी कपूर आदी बडया कलाकारांसोबत त्यांनी चित्रपट केले. जुदाई, संसार, जीवनधारा, इन्कलाब, वतन के रखवाले, नाचे मयुरी, हथकडी, जंग हे त्यांचे काही हिट चित्रपट आहेत.


























































